KIRAN GANGARAM KUMBHAR | DILIP MALI

Exhibition Gallery 2

EVENT DETAILS

KIRAN GANGARAM KUMBHAR,DILIP MALI

KIRAN GANGARAM KUMBHAR | DILIP MALI

Kiran Gangaram Kumbhar

Repeatedly or regularly practicing to improve or maintain one's proficiency in the visual medium while staying close to nature is an important stage in classical art.  This is called a rapturous type.  The notion that the image of nature is reflected in the picture is commonplace.  However, while understanding the subject of painting in an urban environment or in an educational environment in a way of life, the above point may seem appealing, but the proper observation and depiction of that nature, drawing or painting in a unique way is a sign of dexterity and skill.

The unique relationship between nature and agriculture extends beyond the intellectual nature of man.  Fruits are available in natural form but man has been cultivating the land for farming.  Fruit farming turned into industry.  Aesthetic forms are also included in the space of this hybrid.  Artists are looking for those forms.  Its attractive forms are explored by artist's sensitive mind.  The journey of such discoveries is noticed by looking at the works of this artist Kiran Kumbhar.

Orchards are cultivated and grown in the field.  Floriculture is flourishing.  This type is cultivated naturally in the desired form.  The land is hardened.  It is grown in loamy soils.  In the same way, the artist's work is reflected in his work of art.  A similar process is needed to reconstruct the artist's morale in relation to his intellect.

The artist has arranged real and abstract pictures in the accompanying pictures.  Is it the dual state of mind of the artist, or the co-ordinating nature of the primordial and the soul?  It is an eternal truth that the meaning of this picture in the same as nature and agriculture are intertwined.  The fruits that have their own colors are seen to be freely incorporated into the art form.  These forms transform into nature as well as the sensations of the human body.  When the artist tries to develop quality, emotion or skill on his own, he is connected with his surroundings.

What the artist has to face while thinking about the painting style is seen in the painting as his inner mind presents a duel of decisive moments.  Although the painter is raised from a rural background, the distribution of spiritual power is anthropological rather than at the geographical level of nature, whether urban or forest dwelling.

Kiran Kumbhar's childhood was spent in the fertile region of the Sahyadri hills.  He lived in Undale village near Karad in Satara district till the age of ten.  Partly primary education was done in Undale village.  Later resided in Dehugaon, Pune district  for furder education. He obtained his G.D.art diploma at Abhinav collage of art Pune. Due to his job, he is again living in Undale gaon and working as an art teacher in the secondary school of Rayat Shikshan Sanstha Karad.  He has been exhibiting paintings in various exhibitions since 2010.

 

Bhaskar Hande

The Hague, The Netherlands(Holland)

निसर्गाच्या सानिध्यात राहून दृश्य माध्यमात एखाद्याची प्रविणता सुधारण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी वारंवार वा नियमितपणे सराव करत राहणे अभिजात कलेतील महत्वाचा टप्पा ठरतो. हा एक मन मौजी प्रकार संबोधला जातो. निसर्गाची प्रतिमा चित्रात परावर्तित होताना दिसत राहते हा समज सर्वत्र रूढ झालेला आहे. मात्र शहरी समाजव्यवस्थेत किंवा जीवनशैलीत शैक्षणिक वातावरणात चित्रकला हा विषय समजून घेताना वरील मुद्दा हा रूढार्थाने जरी आकर्षक वाटत असला तरी त्या निसर्गाचे  योग्य निरीक्षण व चित्रण, रेखाटन वा रंगवणे अनोख्या ढंगात करणे हे कसब व कौशल्याचे लक्षण असते.

निसर्ग आणि शेती यांचा अनन्यसाधारण संबंध मानवाच्या बुद्धिजन्य स्वभावानुसार व्यापून विस्तारलेला आहे.  फळे नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध होतात परंतु मानवाने जमिनीत लागवड करून शेतीचा व्यवसाय केलेला आहे. फळफुलांची शेती उद्योगधंद्यात बदलली. या संकरणाच्या अवकाशात सौंदर्य रूपे ही समाविष्ठ झालीत.  ती रूपे कलावंत शोधीत आहेत. त्याची आकर्षक रूपे संवेदनशील मनाचे कलाकार कशा पद्धतीने शोध घेतात. अशा शोधांचा प्रवास किरण कुंभार या कलाकाराच्या कलाकृती पाहिल्यावर लक्षात येऊन जाते.

            फळबागा  शेतात मशागतीने लागवड करून पिकविला जातात.  फुलबागा बहरवल्या जातात.  ह्या प्रकारात इच्छित स्वरूपात नैसर्गिक पद्धतीने लागवड केली जाते. जमीन कसली जाते. कसदार जमिनीत पीक घेतले जाते. अशाच प्रकारे कलावंताचा ही कस त्याच्या कलाकृतीत लागतो. अशाच प्रक्रियेची पुनर्बांधणी कलावंताच्या मनोबलाची बौध्दिकतेशी असलेली सांगड कलाकृतीच्या निर्मितीत कसाला लागते.
            सोबतच्या चित्रांमध्ये वास्तव आणि अमूर्त चित्रांची मांडणी कलाकाराने केलेली आहे. त्यांचे वास्तव मूर्त रुपदर्शन आणि आशयमुक्त अमूर्त रुपदर्शन  कलाकाराच्या मनाची द्वैत स्थिती म्हणायची की आद्य व आत्मा यांचे समन्वयक स्वरूप म्हणायचे ?  निसर्ग आणि शेती जसे एकमेकात समाविष्ट आहे असाच हा चित्राचा आशय आहे हे सनातन सत्य. ज्या फळांनी स्वतःचे रूप रंगानी धारण केलेले आहेत तेच रंग आशय मुक्त रूपाने कलाकृतीत समाविष्ठ होताना दिसतात. हे रूप रूपांतर निसर्गात तसेच मानवी शरीराच्या संवेदना म्हणून ही साकारतात.  कलावंत स्वतः गुणवत्ता, भावना किंवा कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा सभोवतालाशी संबंध जडलेला असतो.
            चित्र शैलीचा विचार करताना कलावंताला कोणत्या विचारांचा सामना करावा लागतो हे त्याचे आंतरिक मन निर्णयांकित क्षणांचे द्वंद्व सादर करताना चित्रात दिसते. चित्रकार ग्रामीण पार्श्वभूमीतून उभारलेला असला तरी आत्मिक शक्तीचे वाटप निसर्ग भौगोलिक पातळीवर न करता मानवागणिक होते भले तो शहरवासीय असो वा जंगलवाशीय असो.
            किरण कुंभार यांचा जन्म सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील सुपीक प्रदेशात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड जवळील  उंडाळे गावात झाला आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे शहरात वास्तव्य केले. नोकरीनिमित्त पुन्हा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत कलाअध्यापक म्हणून कार्यरत आहे. 2010 पासून वेगवेगळ्या प्रदर्शनातून ते आपली चित्र प्रदर्शित करतात.

                                         -भास्कर हांडे

नेदरलॅंड


Dilip Mali


If you want to know how an artist born in the background of nature can be invented, then Dilip Mali is right choice , the life journey of this artist till today, by looking at his trails and works of art.  The audience can enjoy how the trees, shrubs, and landscapes of nature blend into the source of inspiration of the artist.

The mind that is engrossed in the surroundings is trying to find the base of these trees in the middle of the busy roads of the city.  Trees that stand on the strength of strong roots in the vicinity of nature, their green feathers, if any, continue to fascinate.  The artist is engrossed in playing in the lap of such a scene.

A picture can be an image of inspiration.  Or the artist seeks the alchemy of expanding the meanings based on the interconnected assumptions that may reflect reflection and influence in the image.  This process is experienced by the artists on a personal level.  At the end of the day, art is created by putting his skills to the test.  While the artist's effort is reflected in the artwork, the mood of the audience will be seen to be metaphorically exhilarating.

The artist seems to be influenced by his own cultured invention while creating a vision of nature in the artwork.  In the same way, he creates the image of inspiration.  This form continues to show in the context of beauty.  Drawing a play of shadows on shapes reflects nature from a particular perspective.  In it, the artist's soulfulness, spiritual and emotional sensations are conveyed through the combination of colors and shapes.  This game of self-salvation and hypnosis continues to be played on the artist's canvas within the limited confines of art.

              Dilip Mali is working as an art teacher.  He was born in corner the hills of Sahyadri in Western Ghats, a Ondhe village in Karad district where nature is evergreen.  Primary education was finished in the village.  College education was obtained in a city like Pune and living for subsistence is within the limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation.  He is teaching in secondary school.  Since 2005 he is regularly participating in Art exhibitions.

 

 

-Bhaskar Hande

The Hague, Netherlands.

 

 

 

सभोवताल निसर्गाने नटलेल्या पार्श्वभूमीत जन्म घेतलेल्या कलावंताचा आविष्कार कसा असू शकेल याची प्रचिती घ्यायची असेल तर दिलीप माळी ह्या कलाकाराची आजवरचा जीवन प्रवास व कलानिर्मिती पाहिल्यावर समजते. निसर्गातील वृक्ष, झाडेझुडपे, निसर्ग दृष्ये, यांचा अंतर्भाव कलावंताच्या प्रेरणेच्या स्त्रोतात कसा मिसळत जातो याचा आस्वाद रसिक प्रेक्षकाला घेता येतो.

सभोवतालात मग्न असलेले मन शहरातील वेगवान वाहनांनी गच्च वाहणाऱ्या रस्त्यांच्या मध्यावर ही वृक्षांचा आधार शोधण्याच्या प्रयत्नात असतो. निसर्गाच्या सानिध्यात भक्कम मुळांच्या ताकदीवर उभे राहिलेले वृक्ष , त्यांचा हिरवागार पिसारा म्हणा हवा तर मोहित करत राहतो. कलाकार मग्न असतो अशाच दृश्याच्या लपंडावात खेळ मांडायला.

चित्र ही प्रेरणेची प्रतिमा असू शकते. वा प्रतिमेत प्रेरणा व प्रभावाचे प्रतिबिंब दिसू शकते अशा परस्परसंबंधी धारणेवर आधारलेल्या आशयांना कलावंत आपापल्या परीने संवेदनेच्या साह्याने विस्तृत करण्याची किमया शोधत राहतो. ही प्रक्रिया कलाकारांना वैयक्तिक पातळीवर अनुभवायला मिळते. त्याचे कौशल्य पणाला लागून प्रयासाअंती कलाकृती तयार होते. कलावंताचा प्रयत्न कलाकृतीतून दर्शित होताना रसिक प्रेक्षकांच्या मनोवस्था प्रतिमागणिक उल्हासित होत जाताना दिसतील.

कलाकार कलाकृतीत निसर्गातील भवतालचे दर्शन घडवताना स्वतःच्या संस्कारित आविष्काराने प्रभावित झालेला दिसतो वा असतो. तसाच प्रेरणास्त्रोतांची प्रतिमा तो मनस्वी साकारतो. हे रूप दर्शन सौंदर्याच्या अनुषंगाने दाखवत राहतो. आकारावर छायाप्रकाशाचा खेळ चितारताना निसर्गाचे प्रतिबिंब एका ठराविक परिप्रेक्षातून ठशा प्रमाणे उमटवितो. यात कलाकाराच्या आत्मिक, आध्यात्मिक आणि भाविक संवेदनांचा पट रंगछटांच्या व आकारांच्या सानिध्याने प्रसवत ठेवतो.  हे स्वयं उद्धाराचे आणि संमोहनाचे  खेळ कलावंत कॅनव्हासवर कलाकृतीच्या मर्यादित सिमे अंतर्गत खेळत राहतो.

 माळी कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या कुशीत, जिथे निसर्ग सदाबहार हिरव्या स्थितीत  असलेल्या कराड जिल्ह्यातील ओंड गावात झाला आहे. प्राथमिक शिक्षण गावात झालेले आहे. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यासारख्या शहरात होऊन उदरनिर्वाहासाठीचे वास्तव्य पिंपरिचिंचवड महापालिका हद्दीत आहे. माध्यमिक शाळेत अध्यापनाचे कार्य करत आहेत. 2005 पासून कलाकृतींचे प्रदर्शन नियमित भरवत असतात.

-भास्कर हांडे

        नेदरलॅंड

SHARE DETAILS

Search Filters

OTHER ONGOING EXHIBITIONS