Art20

Art20

Dnyaneshwar Dhavale | Ribaka Nikam | Anup Sarma

  

  

“शरद पवार यांच्या हस्ते, शिरुरच्या ज्ञानेश्वर ढवळेंच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन”
अँकर –
मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरी ही,     कलाकारांसाठीची पर्वणीच आहे.  नावाजलेल्या कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, नेहमीच येथे पाहायला मिळते. ज्ञानेश्वर संपत ढवळे हे देखील एक नावाजलेले चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई पवार, यांच्या हस्ते मंगळवार दि. २८ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी 4 वाजता झाले. प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तामामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिरुर हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार, श्री गणेश शिंदे साहेब, उपायुक्त
मुंबई पोलीस, पण जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, बाँबे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष अनिल नाईक, कला विभागातील प्राध्यापक श्रीकांत जाधव, सुप्रसिद्ध चित्रकार रवी मंडलिक, तसेच रंगनाथ शितोळे, विनायक काळे, रणजित निंबाळकर, बिपलाब दत्ता, विनयकांत मेहता आदी अतिमहत्वाच्या मान्यवरांनी भेट दिली.
हे चित्र व कलाकृती प्रदर्शन साकार करणाऱ्या ज्ञानेश्वर ढवळे, गुवाहाटीचे अनुप कुमार शर्मा व मुंबईच्या रिबेका नयनजीत निकम यांना मान्यवरांनी शुभेच्छा देत भरभरुन काैतुक केले. हे प्रदर्शन मोफत असुन, २ फेब्रुवारी पर्यंत लोकांना पाहता येईल.
थोडक्यात
ग्रामीण भागातील मातीचा स्पर्श, निसर्गाची बदलणारी विविध रूपे, डोंगर दर्‍या, समुद्र, जहाजे, बर्फाच्छादित प्रदेश असे अनेक विषय चित्रकार श्री ज्ञानेश्वर ढवळे यांनी आपल्या चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून ग्रामीणभागातुन प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढे सर ज जी कला महाविद्यालय मुंबई विद्यापीठ येथून पदवी संपादन केली.
निसर्ग चित्रांचा सराव करत करत त्यांनी क्रिएटिव्ह निसर्ग चित्रांची मालिका करण्यास सुरवात केली. सातत्याने कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या कामात खंड पडू दिला नाही. ३५ समुह ५ एकल प्रदर्शने त्यांनी ललित कला अकादमी, नवी दिल्ली, बजाज आर्ट गॅलरी, मुंबई, जहांगीर आर्ट गॅलरी,मुंबई, पी. एन गाडगीळ आणि सन्स. कलादालन पुणे, जवाहर कला केन्द्र, जयपुर, बिर्ला अकॅडमी कलकत्ता, कलाक्षेत्र कलादालन गुवाहाटी आसाम, बंगलोर,भारतातील नामवंत कलादालना मध्ये त्याची चित्र प्रदर्शन भरविण्यात आली होती
देशात आणि विदेशात त्याच्यां चित्रे संग्रही आहेत.
ऑल इंडिया फाईन आर्ट सोसायटी नवी दिल्ली
रूपवर्णम फाईन आर्ट सोसायटी, गुवाहाटी आयोजित हे कॅम्प मध्ये सहभागी होते.
सध्या
पूर्णवेळ चित्रकार म्हणुन ते आपल्या ग्रामीण भागात वडगाव रासाई, शिरुर, पुणे येथे राहून आपले चित्र काम करत आहेत
सदर चित्र प्रदर्शन
हिरजी जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दिनांक 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत (सायंकाळी 7.00 वा.) विनामूल्य कला रसिकांना उपलब्ध आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + 2 =